Friday, September 4, 2020

ब्रिज

    •  

      खोलीत पसरलेली धुराची वलय ,आजूबाजूला पडलेले कॉफीचे मग ,स्वतःच्या मनाशी 
      उलटेसुलटे कॅल्क्युलेशन करणारा डमी पार्टनर. आणि वादळापूर्वीची निशब्द शांतता असं वातावरण मी अनेकदा अनेक ठिकाणी अनुभवलंय. डील संपताच अरे काय मुर्खासारखा खेळतो...... साधा राणीचा फिनान्स घेता येत नाही ‌.‌‌... किंवा खालती 2 रफ घ्यायचे... Trumps   काढायची एवढी घाई काय ... तत्सम वाक्यांनी सुरुवात करून शांततेचा भंग होतो‌... थोडावेळ वाद होतो आणि...... आणि बरं बरं तुझंच बरोबर ..अरे चालतय यार.. जेंटलमन डाऊन ... असं म्हणत  कोणीतरी पत्ते  वाटतो व आणखीन एका डावाला सुरुवात होते.  हा असला प्रकार किती वेळ चालेल याला मर्यादा नसते..‌.. निदान मर्यादा नसावी असं मला वाटतं. उगीच नावाला दोन तीन रबर्स खेळून खेळ थांबला तर मला बिअरची एक बाटली तिघांनी मिळून प्यायलासारख वाटतं... अरे जेव्हा रात्रर  ब्रिज चालतं तेव्हा कॉकटेलचा नशा येतो ‌.

       


No comments:

Post a Comment