" लहान मुलांनी चहा प्यायचा नसतो " ह्यावर जगातल्या सर्व आई-बाबांचं एकमत आहे त्यामुळे लहानपणी आमच्या घरी सकाळी फक्त आई बाबा चहा प्यायचे व आम्ही सर्व भावंडं "पोलसन "ब्रँडची एक कॉफी मिळायची ती वापरून उकळलेलं कॉफी नावाचं द्रव प्यायचो. .आजकालच्या लहान मुलांना जे त्यांची आई त्यांना नियमितपणे सकाळी प्यायला देते ते आवडत नाही ....मग ते कॉम्प्लान घातलेलं दुध असो ,बोर्नव्हीटा असो अथवा होर्लिक्स असो .पुर्वीची मुल पण तशी काही वेगळी नव्हती त्यामुळे आम्हाला कुणालाही ती कॉफी अजिबात आवडायची नाही पण नाईलाजानं प्यावी लागायची म्हणून बालपणापासूनच कॉफी बद्दल मनात एक राग होता ....नंतर शाळेत पाचवीत असतांना इंग्लिश शिकवणाऱ्या जोशी सरांनी माझं कॉफी या शब्दाचं स्पेलिंग चुकल्यामुळे..... "एक एफ कमी लिहला" म्हणून मला मारलं आणि माझा कॉफी बद्दलचा राग आणखीनच वाढला...... खर तर कॉफी या शब्दाचं स्पेलिंग त्या शब्दातल एकही लेटर बरोबर न लिहता पण चुकवता येत ...... जस कि kauphy ! ....... माझा तर फ़क्त एक एफ़ लिहायचा राहून गेला होता ..... आणि आजपर्यंत कॉफी या शब्दात "दोनदा एफ का " हे कुणी पण मला समजावून सांगितलं नाहीए ...... पण काय करणार ..... लहानपण खडतर असत !
.आमच्या नागपुरात कॉफी हाऊस चौकाच्या मागच्या गल्लीत खुप दुरून भाजलेल्या कॉफीचा मस्त वास यायचा .....प्रथम मला तो कसला वास आहे हे माहित नव्हतं .... एका मित्राकडंन कळलं कि तो कॉफीचा बीया भाजल्यावर येणारा मुग्ध करणारा सुगंध आहे . त्याच कॉर्नरवर एक सुंदर मुलगी पण राहायची ....कॉफीचा आणि रोमान्सचा काही तरी संबंध असतो हे तिथंच कळलं ....एका कॉफीच्या ऍड मधे कॉफीचा उंच ठेवलेला डबा काढायला एक नवरा आपल्या बायकोला वर उचलतांना दाखवलं आहे ! कॉफीचा रोमान्सशी घनिष्ट संबंध असल्याशिवाय अशी ऍड कुणी काढणार नाही . पुढे बऱ्याच ठिकाणी कॉफीचे वास घेतल्यानंतर माझा कॉफी बद्दलचा आकस आता पूर्णपणे दूर झाला आहे . नागपुरात तेंव्हा सायकल वर फिरायचो म्हणून कॉफीचे वास कुठे कुठे येतात हे पाठ होत .... . असो.
जगात सर्वात जास्त किंमत आणि इभ्रत असते ती ब्रँडला ...... व्होल्वो जसा एक "बस " चा प्रकार आहे किंवा मर्सिडीज जसा एक कार चा प्रकार आहे तसच कॉफी मध्ये नेसकॅफे च स्थान आहे. सर्व काही नाव बोलून जात. हॉटेल मध्ये जर कॉफी ऑर्डर केली तर लगेच " कॉफी कौंसी साब...नेसकॅफे या फिल्टर " हा प्रश्न वेटर विचारतोच. मेन्यू मध्ये पण कॉफी आणि नेसकॅफे अशे वेगळे आयटेम्स असतात . मेन्यू वरून एक प्रसंग आठवला ...एकदा माझा एक भाचा दिल्लीला एका गजबजलेल्या कॉफी शॉप मध्ये कौतुकान मला कॉफी प्यायला घेऊन गेला आणि तिथं आल्यावर मला कळलं कि कॉफीचं विश्व् किती अफाट मोठ्ठ आहे . माझ्यासमोरचा मेन्यू कार्ड मध्ये कॉफीचे अक्षरशः छप्पन प्रकार होते आणि एक एस्प्रेसो कॉफी सोडली तर सर्व प्रकार मला नवीन होते . " एस्प्रेसो " , "अमेरीकॅनो" , " कॅफे लेटे " , " मोच्चाछिनो " , " करामे मॅकछिऍटो " हे कॉफ़ीचे काही सर्वात प्रसिद्ध प्रकार आहेत ह्याचा शोध मला लागत होता . माझ्या चेहऱ्यावर आलेले बावळट भाव माझ्या भाच्यांनी आणि वेटरनी पण टिपले होते . " काका .... आप क्या लोगे ? " माझा बावळटपणा न लपवत " कुछ भी पिलाव ...पी लेंगे " असं मी सांगितलं तरी " आपने " कॅप्युसीनो " कभी लीयी है क्या ? असा वायफळ प्रश्न मला विचारला गेला . मी कॅप्युसीनोला मूक संमती दिली . नंतर एका भल्यामोठया कॉफी मग मध्ये १८० रुपयाची " कॅप्युसीनो " सर्व्ह करण्यात आली .कॉफी बघितल्यावर वाटलं " एवढी कॉफी आपण कधी बाप जन्मात प्यायली नाही हि कशी संपणार ?" .... पण माझा भ्रम लवकरच दूर झाला कारण हळू हळू कॉफी मग मधला फेस आक्रसू लागला . मी कॉफी प्यायला सुरवात केली पण बराच वेळ तोंडात खरोखर फेस येत होता ! थोड्या वेळानं मला गोड क्रीम खातो आहे असं काही तरी वाटू लागलं ...... आणि शेवटी जेंव्हा कॉफीची चव येऊ लागली तेंव्हा लक्षात आलं कि " इट इज ऑल ओव्हर ." माझा भाचा मात्र जणू रोज तो हीच कॉफी पितो अशा थाटात कॉफीचा आस्वाद घेत होता . कॉन्फिडन्स असावा तर असा !
४०- ४५ वर्षांपूर्वी .... म्हणजे जेंव्हा नेसकॅफेच ५० ग्राम च पाकीट फक्त ६ रुपयाला मिळायचं तेंव्हा ,प्रथम मी नेस्कॅफेच्या प्रेमात पडलो .... आज तेच पाकीट २० पटीनं महागलंय तरीही इतक्या वर्षानंतर पण त्या नेसकॅफेच्या फ्लेवर मधे कुठलाही बदल झाला नाहीए.... आणि नेसकॅफे कॉफी वरच माझं प्रेम पण अजूनही कायम आहे. कंसीस्टंट्ली अशी क्वालिटी क्वचितच दिसते . आणि म्हणूनच माझ्या मते कॉफी म्हणजे नेसकॅफे ! आणि हे मत विदेशात म्हणजे पॅरिसमध्ये कॉफी प्यायल्यानंतर पण कायम आहे . हे मुद्दाम सांगायचं कारण असं कि कुणीतरी म्हटलंय की " पॅरिस मध्ये तुम्ही जर कॉफी प्यायला नाही तर तुम्ही पॅरिस बघितलंच नाही " म्हणून जेंव्हा मी पॅरिसला गेलो होतो तेंव्हा असच काहीतरी अजब नाव असणारी " डेलिकसी " असलेली कॉफी प्यायली होती ....त्या कॉफी मध्ये स्कॉच टाकली होती हे नंतर कळलं ..... म्हणजे "चवीवरून" नाही कळलं कारण स्कॉचची चव माहीतच नव्हती ...... ... रात्री इंटरनेट वर त्या कॉफीची रेसिपी वाचून कळलं की जे अत्यंत कडू द्रव आपण प्यायलो त्यात स्कॉच होती ! ...... पण तरीही पॅरिसमध्ये काय कॉफी मिळते राव ..... असं किती तरी जणांना मी ऐकवलं आहे ! पण सत्य हे आहे की नो मॅच तो नेसकॅफे !!
माझे साऊथ इंडियन मित्र मात्र नेसकॅफे बद्दल असलेलं माझं मत अजिबात मानत नाही ..तुम्ही कधी साऊथ इंडियन माणसांकडे कॉफी प्यायली आहे का ? .प्रथम ते कॉफी ....म्हणजे कॉफीच्या बीया , कुठून आणल्या व त्या कशा भाजल्या याबद्दल आपल्याच बायकोशी किंवा दुसऱ्या साऊथ इंडियनशी चर्चा करतील ..... आपल्याला त्यातील एक शब्द पण कळणार नाही ..... मग आपल्या खास इंग्लिश मध्ये ते आपापसात काय काय बोलले हे आपल्याला समजावून सांगतील . थोड्या वेळानं ते अतिशय कौतुकानं त्यांच्या स्टीलच्या भांड्यात आदल्या दिवशी उकळून ठेवलेल डीकॉकशन वापरून फेस वाली फिल्टर कॉफी प्यायला देतील. यातील जे भांड उंच असत त्याला कप म्हणतात आणि जे थोडं पसरट असत ते "बशीच " काम करत असं तुम्हाला समजावून सांगतील ....... गरम उकळत्या कॉफीशी एका भांड्यातंन दुसऱ्या भांड्यात असं कॉफी पिण्यापुर्वी खेळायचं असत ..... याचा अनुभव नसेल तर असा खेळ तुम्ही करू नका कारण हात भाजतो व कॉफीचे कपड्यांवर डाग पडायची पण शक्यता असतें ...... अस्सल साऊथ इंडियन मात्र रंगात येऊन अभिमानानं ह्या कॉफीशी खेळतात ..... मद्रास मध्ये तर मी तीन चार फूट लांब कॉफी पहिली आहे ..... आणि तेंव्हा टॉपची हीरॉइन "हेमा मालिनी" न सांडवता सर्वात लांब कॉफी करणाऱ्याशी लग्न करणार अशी एक अफवा होती ! त्यामुळे लांब कॉफी करणाऱ्यांची जणू काही स्पर्धाच असायची ! कडू लागली तरी या प्यायलेल्या फिल्टर कॉफीला छान म्हणायच असत हे लक्षात ठेवा ..... . सर्वच ठिकाणी फिल्टर कॉफी चांगली असते असं नाही. ह्या कॉफीच्या कडवटपणा अफलातून असतो .........तुम्ही "मला कारल्याची भाजी खुप आवडते " असं खोट बोलणारे अनेक जण बघितले असतील . .... कारल्याचा हा कडवटपणा पहिल्यांदा खर तर कुणालाच आवडत नसतो पण ज्याची खरंच टेस्ट डेव्हलप होते त्याला हा कडवटपणा आवडू लागतो .....बियरच पण तसच आहे आणि तोच नियम बहुदा स्ट्रॉंग फिल्टर कॉफीचा आस्वाद घेणाऱ्यांना पण लागू पडत असावा. फिल्टर कॉफीचा कडवटपणा खरंच गोड असतो हे कळायला साऊथ मध्ये जावं लागत किँवा बरेच पावसाळे घालवावे लागतात !
कर्नाटक राज्यात एक चिकमंगलूर नावाचं गाव आहे ....असं म्हणतात की भारतामध्ये सर्वप्रथम याच ठिकाणी कॉफीचा जन्म झाला आणि मग हा हा म्हणता संपूर्ण दक्षिण भारतात कॉफी फोफावत गेली ...आज भारताची कॉफी जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानल्या जाते आणि म्हणूनच कॉफीचा साऊथ इंडियन लोकांना अतिशय अभिमान वाटतो यात नवल नाही. साऊथ मध्ये गेल कि चहाच दुकान शोधावं लागत आणि रेल्वे स्टेशन वरचा चहा जसा भुक्कड असतो तशींच भुक्कड कॉफी एखाद्या टपरी वर चहा मिळत नसल्यामुळे प्यावी लागते हा माझा अनुभव आहे. साऊथ इंडियाचा दोसा सगळीकडे मिळतो पण चेन्नाई च्या खाली गेलं कि आपला चहा तर सोडाच कुठं चांगलं पान पण मिळत नाही ....एकदा " मीठा पान" मागितल्यावर एका पानवाल्या मद्राश्यांनी मला चक्क साखर घालुन पान दिल तेंव्हा माझ्या पोटात किती डचमळून आलं होत याच्या आठवणीनेच अंगावर शहारा येतो . पोटातलं " रस्सम भात " , " सांबार भात " इ. इ. त्या दिवशी बाहेर आले नाहीत हे माझं नशीब ! साऊथ मध्ये बरेच दिवस मुक्काम असल्यामुळे आणि चहाचा अभाव असल्यामुळे शेवटी नाईलाजानं कॉफीच्या कडवटपणाची सवय करावी लागली आणि रोज रोज काळी माणसं बघून उबलेल्या माझ्या जीवाला ती कडवट कॉफी हळूहळू गोड वाटू लागली . कॉफी पिणारे बरेच लोक मात्र स्व:ताला काहीतरी विशेष समजतात ..यात दोन प्रकार असतात एक म्हणजे जे एक्सक्लुसिव्हली फक्त कॉफीच पितात आणि दुसऱ्या प्रकारात माझ्यासारखे ....... ज्यांना कि चहा पण चालतो. पहिल्या प्रकारच्या लोकांची मला प्रथम भेटीत जरा भीतीच वाटते ...कारण चहा पिणाऱ्यांना ते उगाचच तुच्छ समजतात . माझं स्पष्ट मत आहे कि कॉफी प्यावी पण चहाला अव्हेरू नये. असो .
लग्नानंतर घरी कॉफी व बाहेर चहा पीत दिवस जाऊ लागले ..... मग अचानक रीडर्स डायजेस्ट मध्ये एकदा वाचण्यात आलं कि " एक कप कॉफी ,एक कप चहा आणि एक ग्लास बीयर या मध्ये आरोग्याला सर्वात डेंजरस एक कप कॉफी असते व सर्वात उत्तम एक ग्लास बियर असते ".....हे खर तर धादांत खोट आहे . मात्र रोज बियर पिणाऱ्या एका डॉक्टर मित्रान कॉफी पिणं डेंजरस असत हे कनफर्म केलं व रोज कॉफी न पिण्याचा मला चुकीचा सल्ला दिला..... तेंव्हापासूनच मी नियमित कॉफी प्यायचं बंद केलं आणि रोज बियर परवडण शक्यच नसल्यामुळे मुकाट्याने चहा प्यायला सुरवात केली . .... खर तर कॉफीमधल्या कॅफीनच्या नावान शंख करून कॉफीला डेंजरस म्हणणारे लोक हे विसरतात कि कॅफीनच्या व्यतरिक्त कॉफीमध्ये इतर इतके उपयोगी मिनरल्स असतात जी कि आपल्याला कुठल्यापण भाज्यांमध्ये किंवा फळांमधे मिळत नाही . काही लोक तर कॉफीला "कंप्लिट मिल " समजतात . पण काय करणार खऱ्याचा जमानाचं राहिला नाही !....... थोडक्यात काय पुर्वी मी कॉफी पार्टीत होतो व आता पक्ष बदलला आहे !

कॉफी करायला सर्वात सोपी .......मी नेसकॅफे बद्दल बोलतोय ...ज्याला दूध तापवता येत तो नेसकॅफे करू शकतो असा माझा समज होता पण तरीही एकदा विचित्र अनुभव आला .. एका ठिकाणी मित्राबरोबर गेलो होतो ...रात्रीचे ९ वाजले असतील .कॉफी आली . मला पहिल्या घोटताच कळलं कि कॉफीत साखर कमी आहे ...पण संकोचाने तस मी सांगितलं नाहीं ...दुसरा घोट पहिल्यापेक्षा बरा होता .....प्रत्येक घोटा बरोबर कॉफीच्या चवीमध्ये सुधारणा होत होती ! .... माझ्या लक्षात आलं कि तळाशी बरीच साखर आहे व शेवटचे घोट घेतांना मला तर असं वाटलं कि मी पाक पितोय ! सांगायचं तात्पर्य कि साखर व कॉफी जरी बरोब्बर प्रमाणात टाकली तरी चमच्यानं व्यवस्थित ढवळण पण महत्वाचं आहे !
बऱ्याच वर्षापुर्वी संजीव कुमार आणि शर्मिला टागोर यांचा एक " गृहप्रवेश " नावाचा सिनेमा पहिला ....तस हिंदी सिनेमात न कळण्यासारखं काही नसत पण त्या सिनेमात शर्मिला टागोर कॉफी पिते व संजीव कुमार चहा पितो एवढंच मला तेंव्हा कळलं . .दोन अडीच तास डोक्याला खुप त्रास देऊन वासू भट्टाचार्यानी एवढंच सांगितलं कि वाट्टेल त्या ठिकाणी किंवा कुठल्यापण जागी कितीही वेळा चहा प्यायलो तरी घरी आल्यावर प्यायलेल्या कॉफीची सर काही वेगळीच असते . आज ३५ वर्षणानंतर मला " गृहप्रवेश " मध्ये सांगितलेलं म्हणणं पटलंय .... कारण चहा कुणाही बरोबर प्यायला तरी चालत पण कॉफीचीं मजा छान कंपनी असल्या शिवाय येतच नाही ! कॉफीचा सर्वात जास्त आनंद मिळतो तो म्हणजे रात्री जेवण झाल्यावर कुठल्या तरी फॅमिली फ्रेंडच्या घरी प्यायलेल्या कॉफीचा ....इथं महत्व कॉफीच्या चवीला नसत ....कॉफी कोल्ड आहे कि हॉट आहे याला पण नसत ...आनंद असतो तो रिलॅक्सड मूड मध्ये मारलेल्या गप्पांचा किंवा हवी असलेली कंपनी मिळाल्याचा ! या कॉफीची मी नेहमीच वाट बघत असतो !

------------ राजेन्द्र फणसळकर , ५ मार्च २०१७
==============================================================================