फार फार वर्षापुर्वी आपल्या देशात चहा हा पदार्थ नव्हता . लोक निरस दुध प्यायचे .... दुधचं काय पेहलवान लोक तूप पण प्यायचे !.. असं म्हणतात कि भारतात "चहा" प्रथम चीन मधून आला ...पण चायनीज माणसांनी आणलेल्या त्या चहात कुणी दुध किंवा साखर टाकत नव्हतं. हा चहा फक्त औषध म्हणून वैद्य वापरायचे
.... नंतर एकोणिसव्व्या शतकाच्या सुरवातीला इंग्रजांनी भारतात चहाच उत्पादन मोठ्या प्रमाणावर करायला सुरवात केली . हेतू हा कि चीनची चहाची "मोनोपली" संपवायची . इंग्रजांची "हांजी हांजी" करणारे लोक त्यांच्या बरोबर "नाइस टी सर "म्हणत आवडत नसून पण तो काळा चहा प्यायचे. चहाच्या गरम काढ्यात त्याचा काडवटपणा कमी करायला त्यात आपल्या लोकांनी मग साखर टाकायला सुरवात केली आणि लोक दुधाऐवजी आवडीने ब्लॅक टी पिऊ लागले .....जसजशी इंग्रजांची सत्ता पक्की होऊ लागली चहा पिणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढू लागलं व दुध पिणाऱ्यांचं प्रमाण कमी होऊ लागलं. मग आपल्या लोकांना दुधाचं काय करायचं ते कळेना ?... ...कुणी एकानी त्या चहाच्या काढ्यात रागारागात दुध टाकलं आणि चॉकलेटी काळसर रंगाच्या त्या काढ्याने आपला रंग बदलला आणि चहाच्या इतिहासातला तो
"टर्निंग पॉईंट " ठरला ..... आणि मग गोऱ्यांबरोबर काळा चहा पिणारे
काळे लोक व
फक्त दुध पिणारे
बरेचसे भारतीय गोरे
लोक त्या सावळ्या - गोऱ्या
चहाच्या प्रेमात पडले ते आजवर
गटांगळ्या खात आहेत ! ज्यांच्याजवळ कमी
दुध असायचं त्यांना पण
हा गोरा चहा
पिणं आवडू लागल.जस जशी वर्ष
गेलीत चहा पिणाऱ्यांची संख्या
खुप म्हणजे खुपच
वाढू लागली इतकी
कि विसाव्या शतकाची
सुरवात होता होता
दुधाच्या नद्या वाहणाऱ्या आपल्या
देशात दुध कमी पडू लागलं
! आणि
मग तेंव्हा पासून पाण्यात दुध मिळवण्याचा प्रकार सुरु झाला
तो आजपण चालू
आहे असा हा
चहाचा थोडक्यात इतिहास
आणि प्रवास आहे. आता
निदान आपल्या देशात
तरी चहा , दुधावरच अवलंबून आहे
आणि ब्लॅक टी
पिणारे निश्चीतच अल्पमतात आहेत.
दुधामध्ये पाणी मिसळणे ह्याला
आता कुणीपण चुकीचं
समजत नाहीं आता
काळजी करातात ती
"कुठलं
पाणी मिसळलं असेल
याची ". ..... " " आमचा दुधवाला खूपच
प्रामाणिक आहे ....तो सांगून
पाणी मिसळतो आणि
ते पण बिसलेरीच ! " अस जर
कुणी सांगितलं तर
त्यांच्यावर विश्वास ठेवा ! माझ्या लहानपणी दुधवाले सायकल
वरून दुध द्यायला यायचे.....
आजकाल बहुतेक सर्व
मोटर सायकलवर येतात ..... ५० रुपये
लिटरचे दुध वाटायला ८० रुपये
लिटरच पेट्रोल खर्च
करणारे दुधवाले , दुधात पाणी मिसळणारच हे आता
सर्वांना मान्य आहे त्यामुळे त्यांना कुणीही दोष देत
नाही. .... देवा- शपथ मी
तर हरियाणात "मर्सीडीज" कारनी दुध
वाटणारा दुधवाला बघितला आहे !.... ....दहा एकर
शेतीतून २ एकर विकल्यावर त्याला
जवळ जवळ सव्वा
करोड रुपये मिळाले
म्हणून थोड्या पैशात
मर्सीडीज घेतली व "टाइम पास"
साठी दुधाचा धंदा
चालूच ठेवला .... धंदा बंद
केला तर दिवसा
पण दारू प्यायची सवय
लागेल अस " दुध वाटप
बंद न करण्याचं "कारण त्यानी
मला सांगितल तेंव्हा त्याच्या तोंडाला आदल्या रात्री प्यायलेल्या दारूचा
वास येत होता ! त्याच्याजवळ मुर्रा जातीच्या ६
म्हशी आहेत . एक
एक म्हैस सकाळ संध्याकाळ किमान
३०-३० लिटर
दुध देते . हरियाणातल्या म्हशीच्या दुधात
फॅट कंटेंट जास्त
असत ......काय करणार .... बिचारा .... केवळ
लोकांना दुध पचायला त्रास व्हायला नको म्हणून
नाईलाजानं दुधात पाणी मिसळतो
!
" हरियाणा ....जहाँ दूध-दही
का खाणा और राजदूत
पे आणा जाणा
" ह्याला
पण आता ५०
वर्ष होऊन गेलीत
आणि " राजदूत " मोटर सायकल पण
आता बंद झाली.....
तेंव्हाचे राजदूत मोटर सायकलवरून येणारे
दुधवाले आता मर्सिडीज मधे येत असतील
तर नवल वाटायचं कारण
नाही. ! आता जमाना आहे
तो "अमूल द टेस्ट
ऑफ इंडिया" चा. पण
अजूनही दूधवाले भय्ये
दिसतात .... दुधवाल्या भय्य्कडून घेतलेल्या दुधाचा
एक फायदा असतो
.. दुध
गरम करतांना त्याकडे लक्ष
द्यायची गरज पडत नाही
...... जास्त
वेळ गरम केलं
तर ते आटत
पण... वर जात नाही
! एरवी भांड न
जाळता दुध गरम
करणे हे सोपं
काम नाही ...." मंदाग्निवर दुध तापवावं म्हणजे
घट्ट साय येते ही
अफवा बहुतेक सर्व
बायकांपर्यंत पोहचली आहे " त्यामुळे आमच्या
घरी पण सीम
गॅस करून दुध
तापायला ठेवलेल असत. बऱ्याचदा
" जरा
दुधाकडे लक्ष दे " असं मला
सांगण्यात येत .......बायकोला थोडी तरी मदत
करायला हवी या
सूज्ञ विचार करून
मी मग त्या
दुधाकडे बघत वेळ घालवायला गाणी
म्हणतो ... २-३
गाणी झाली तरी
दूध वर जायला
तयार नसत ... मी
अगदी कंटाळून जातो
पण दुध ढीम्म हलत नाही
...... मला
तर आता असं
वाटत कि आपण
जेंव्हा दुधावर लक्ष ठेवतो
तेंव्हा दुध पण आपल्यावर लक्ष
ठेवत असत ... ...कारण एरवी
कंटाळा आला तरी
वर न जाणार
दुध आपण जरा
इकडे तिकडे दुसरं
काही करू लागलो
कि लगेच वर जाऊन
भांड्याबाहेर धावत सुटत ...आणि
मग....... मग काय ... " एक साधं
काम नाही करता
येत आफिस मध्ये
काय करतो देव जाणे
" इ.
इ . असो
सॉरी..... खर तर आपण
दुधाबद्दल नव्हे तर चहा
बद्दल बोलत होतो .....पण चहा
आणि दुधाचा घनिष्ट
संबंध असल्यामुळे थोडं
विषयांतर झालं . सकाळी उठल्यावर दिवसाची सुरवात
जेंव्हा उत्तम चहानी होते तेंव्हा मन
कस प्रफुल्लित होत.... उत्साही वातावरण निर्माण करायची जादू या चहात
आहे ....उगाच नाही
आपले लोक चहाच्या प्रेमात पडले
! . तसच
मनासारखा, आपल्या चवीला सूट
न होणारा चहा
मिळाला तर न
कळत एरवी शांत असलेल्यांची चिडचिड सुरु
होते.... या चहामुळे कित्येक लग्न
ठरली आहेत आणि
मोडली पण आहेत
! इतकी ताकत ह्या
चहामध्ये आहे . .... आता उत्तम चहा
कशाला म्हणायचं यावर
एकमत होणं अशक्य
आहे. काही काही
गोष्टींवर एकमत काधिच होत
नाही
. चहाच
म्हणाल तर आजचा
चहा कालच्या किंवा
सकाळी केलेल्या चहा
सारखा कधिच नसतो.
..... ह्याला
कारण अनेक आहेत...
"चहा
ताज्या दुधाचा आहे
कि तापवून ठेवलेल्या दुधाचा
आहे?" , "किती वेळ उकळला
?",.... ..... "साखर किती
आणि केंव्हा घातली
?",...." चहा
किती कप केला?".....
"कुणी
केला ?"..... असल्या अनेक क्षुल्लक वाटणाऱ्या कारणांमुळे चहाची
चव बदलत असते.
मुद्दाम कुणीच बेकार चहा
करत नाही ...निदान
नसावं .... आणि केलेल्या चहाची चव
कशी असेल हे
चहा करणाऱ्याला पण
खरंच माहित नसत
. .... यावर
उपाय हा की
एकसारख्या चवीचा चहा करायच्या फंदात
न पडण ! कधी
त्यात आलं टाकावं
तर कधी वेलदोडा तर
कधी चक्क चहाचा
मसाला ! मसालेवाला चहा
ज्याला माहित नाही
तो निश्चितच गुजरातमधे गेला
नाही अस समजावं
. गुजरातचा हा मसालेवाला चहा
, जस पहिल्यांदाच प्यायल्यावर बियर
जशी आवडत नाही तसाच
काही तरी आहे
. ह्या चहात दालचिनी ,ज्येष्ठमध ,लवंग,इलायची सुंठ असल्या
अनेक गोष्टींचा स्वाद
असतो.... फक्त चहाचा स्वाद
नसतो ! नशीब हे
लोक त्या मसालेदार चहाला
फोडणी देत नाही
कारण आपल्या भागात
मुबलक होणार तेल
संपवण्याची आपलीच जबाबदारी आहे
असा ह्या लोकांचा समज आहे.....
. पण फोडणी दिलेला
चहा कुणाला प्यायचा असेल
तर त्यासाठी काश्मीर मध्ये
जावं लागेल !.....दिल्ली .. राजस्थान , पंजाब
, हरियाणा मध्ये चहा म्हणून
फिक्कट चहाच्या रंगाचं दुध पितात
ते पण मोठ्या
ग्लासमध्ये ! "हमारे यंहा चायमे
पानी नही डालते
" असं
ते अभिमानानं सांगतात व
पुष्कळ ढाब्यांवर अशा पाट्या
पण असतात !.फक्त
लहान मुल दुध
पितात आणि मोठ झाल्यवर चहा
प्यायचा असतो म्हणून हे
लोक पांढऱ्या दुधाऐवजी गुलाबी दुध
पितात इतकच ....... मुंबई पुण्याकडचे लोक
, जेवढा चहा उत्तर
भारतातले लोक चहा पिऊन
कपात सोडून देतात
... जवळ
जवळ तेव्हडाच चहा
ते वाईन ग्लासपेक्षा किंचित
मोठ्या ग्लासमध्ये पितात . ह्या
चहाची चव कळेपर्यंत चहा
संपलेला असतो.! ..... मध्य प्रदेश मध्ये
खडा चम्मच चहा
असतो ...खडा चम्मच
म्हणजे ग्लास मध्ये एवढी साखर
टाकतात कि चमचा
ग्लास मधे उभा
राहील ! चहाच्या नावाखाली हे
लोक पाक पितात .... कलकत्यामध्ये चहात
जेमतेम दूध घालतात
तर सिक्कीम ,आसाम
इकडे चहात दुध
का घालतात ह्याच तिथल्या लोकांना आश्चर्य वाटत
आणि जवळ जवळ
संपूर्ण दक्षिण भारतात ... " मुळात लोक
चहा पितातच का ?...कॉफ़ी का
नाही पीत ?" असा मुद्दा असतो व
चहा पिणाऱ्यांना चक्क
तुच्छ लेखण्यात येत ! चहाला भारतामध्ये आणणाऱ्या इंग्रजांना पण मद्रासी लोकांनी कॉफी
पाजली ...तुमची माझी
गोष्टच सोडा. . असो.
प्रत्येक प्रांतातला काय प्रत्येक घरातला
पण चहा वेगळा असतो
कारण चहाचा ब्रँड
आणि चहा करायची
पद्धत काहीतरी वेगळी
असते . चहाच वेगळेपण हेच खार तर त्याच भूषण आहे . मला
जर कुणी विचारलं कि
करायला सर्वात कठीण
पदार्थ कुठला तर
मी "चहा "असाच उत्तर देईन
कारण कंसीस्टंटली उत्तम चहा करणारी
व्यक्ति अजून तरी माझ्या
माहितीत नाही. पदार्थ एकच
पण प्रत्येक वेळी
त्याच्या चवीत म्हणा किंवा
फ्लेवर मधे म्हणा
काही तरी फरक
असतो . कित्येकांना नेमका काय फरक
हे सांगता येत
नाही पण जाणवतो
मात्र नक्कीच !
याला अपवाद म्हणजे
मुंबईतील
इराण्यांची हॉटेल , जी आता
कालबाह्य होत आहेत. इराण्याच्या हॉटेल
मध्ये केंव्हाही प्यायलेल्या चहाची
चव एकच असते.....
चांगली असते असं
नाही ...... पण चहा मागवल्यावर काय
मिळेल याची ऍब्सल्युट क्ल्यारिटी फक्त
इथेच असते !
चहा करायच्या अनेक
पद्धति आहेत पण
चहा
करण्याचा सर्वात नि:र्बुद्ध प्रकार
हिंदी सिनेमात बघायला
मिळतो . ....एखाद्या प्रशस्त दिवाणखान्यात किँवा लॉन वर
असलेल्या गार्डन चेयरवर ३-४
जणांबरोबर हीरो बसलेला असतो ...कुणीतरी वेटर
मग ट्रे मधे
किटली आणि उत्तम
चहाचा सेट घेऊन येतो
.... "बेटी
जरा चाय बना
दो " असा हिरोईनच्या मिशीवाल्या बापाचा डायलॉग
असतो .... व हसतमुख वातावरण असत
..... मग
स्लिव्हलेस ब्लाउज घातलेली हिरॉईन
किटलीमधून "दुध न घातलेला चहा"
कपात ओतते व " शक्कर कीतनी
एक चम्मच कि
२ चम्मच असं
काहीतरी अतिशय प्रेमानं विचारते " ....हीरो दुधाकडे बघत
त्याला डेढ चम्मच
असं उत्तर देतो...
यावर सर्व मठ्ठ
लोक जोरानी हसतात
....मग
देढ चम्मच साखर
चहात घातली जाते आणि
किंचित दिसेल असं
दुध टाकुन हिरॉईन
चांदीचा चमचा घालून हिरोला
चहाचा कप देते . ही
चहाची रेसीपी बघून
जगात कुणाला पण चहा
करता येणार नाही
याची खात्री आहे.
....असो
मागील पिढीत चहा
करण ही एक
प्रोसेस होती ....आधी पाणी
गरम करायचं ...चहासाठी गरम
करायला ठेवलेल्या पाण्याला " आधण " म्हणतात हे बऱ्याच
जणांना माहित नसेल
...ह्याला
"चहा
मांडला" असं म्हणतात किंवा
"चहा
टाकलाय" असं पण म्हणतात ..... पाणी जरा
गरम झालं कि
मगच त्यात साखर टाकायची आणि
साखर विरघळून थोडी उकळी
आल्यावरच त्यात चहाची पत्ती टाकायची. नंतर जेंव्हा त्या चहाची
भांड्याबाहेर बाहेर यायची धडपड सुरु
होते तेंव्हा ते भांड
उतरवून त्यावर झाकणी
ठेवायची . दुसऱ्या भांड्यात दुध तापवायचं . दूध
तापल्यावर एकदा चहावरच झाकण काढून
तो बसला कि
नाही हे चेक
करायचं ....बहुतेकवेळा तो बसला
नसतोच ..... मग पेशन्स असेल
तर वाट बघायची
.....नाहीतर
सरळ चहा गाळून
त्यात डार्क चॉकलेटी रंग
जाऊन सुंदर चहाचा
रंग येईल इतकंच
दुध टाकायचं आणि
दुध टाकतांना साय कपात पडू
द्यायची नाही ....असं केल
कि पारंपरिक पद्धतीने केलेला
चहा तय्यार ! ...... असा चहा
अलीकडे कुणीच करताना
दिसत नाही ह्याच
मला फार दु:ख होत ...... अलीकडे.... थंड गार
पाण्यात फ्रिज मधलं थंड दुध ,साखर आणि
चहाची पत्ती एकदमच
टाकून त्याला भरपूर
उकळण्यात येत.... दॅट्स इट ..... झाल .... तयार झालेल्या द्रवालाच चहा म्हणायची पद्धत
आहे. तुमच्या नशिबानं दुध
जर ताज असेल तर
ते द्रव थोडं
फार चहा सारखं
लागत ... एक "गरम"असतो
हे सोडलं तर
उत्तम चहाच्या गुणांचा इथ
पूर्ण अभाव असतो . आजकाल
काळजी म्हणून अथवा
फॅशन म्हणून कमी
साखर असलेला चहा प्यायचा प्रकार
बोकाळला आहे त्यामुळे थंड
पाणी आणि दुधाच्या मिक्शचर मधे
साखर पण टाकायची गरज
नसते ! फास्ट फुडच्या जमान्यातली ही
चहा करायची फास्ट
पद्धत आहे , चहाचा
आणखी एका प्रकारानी घोर अपमान
करायचा असेल तर
"डीप-डीप " चहा करावा.... ह्यात दुध
व वेळ दोन्हीची बचत
होते
. " इफ यू वॉन्ट
इट स्ट्रॉन्गर डीप
इट लिटील लॉन्गर
" हे
ऐकायला गोड वाटत
पण असं केलं
तर तयार झालेल
पेय कोंबट होत
आणि मचूळ लागत
आणि चहा निदान
गरम असावा ह्या "अपेक्षेला" पण आपण
मुकतो तेंव्हा डीप
डीप च्या वाटेला
खरे चहाचे चाहते जात
नाहीं . ..... ह्याशिवाय ,लेमन टी ,ब्लॅक
टी ,ग्रीन टी
असे चहाचे अनेक
मूर्ख प्रकार आहेत
पण शहाण्या माणसांनी त्यांच्या फंदात
पडू नाही ...... चहा कसा
असावा ? ....याच थोडक्यात उत्तर आहे
" गरम
, कढा, गाढा व
मीठा " ... आणि असा चहा
तुम्हाला फक्त आमच्याकडेच मिळेल
!
चहा दिवसातून किती
वेळा प्यावा ,कुठे
प्यावा , दिवसातल्या कुठल्या प्रहरी
प्यावा ,ह्याचे कुठलेपण नियम
नाहीत ह्याला कुणी मर्यादा घालू
पण नये. जास्त चहा
प्यायल्याने तब्येत खराब होते
हे साफ खोट
आहे कारण गेली
कित्येक वर्ष मी रोज
फक्त ६-७
कप चहा पितोय
पण अजून मला
कुठल्याही गोळ्या खाव्या लागत
नाही .... लोक डोकं
दुखत तेंव्हा उपाय
म्हणून कुठल्या कुठल्या गोळ्या
खातात पण डोकं
दुखायचं खरं कारण असत
कि चहा पिउन २ तास
होऊन गेलेले असतात
.... ....डोकेदुखीवर उत्तम
औषध कडक चहा
आहे असं माझं
ठाम मत आहे.
..... एक
वेळ संध्याकाळी बियर
किंवा व्हिस्की नाही
मिळाली तर डोकं दुखणार
नाही व काही
बिघडणाऱ नाही पण सकाळी
किंवा दुपारी चहाच्या वेळेला
चहा मिळाला नाही
तर डोकेदुखीनं लोकांचं जगणच
अशक्य होऊन जाईल
हे निर्विवाद सत्य
आहे . याचा अर्थ
चहाच व्यसन दारूच्या व्यसनापेक्षा वाईट
आहे असं मात्र
नाही .... चहा पिणाऱ्याला कुणी
बेवडा म्हणत नाही
उलट न पिणाऱ्याला वेडा
म्हणतात !
चहा कसा प्यावा
यापेक्षा कसा पिऊ नये
हे सांगणं मला
स्वानुभवाने जास्त महत्वाचं वाटतय
... चहा
थंड करून कधीही
पिऊ नये कारण
तस केलं तर
एक तर विष
प्यायल्यासारखं
वाटत आणि चहा
करणाऱ्याला त्याचा अपमान झाल्यासारखं वाटत
. "चहा
कुठे प्यावा " विचारलं तर
उत्तर आहे रेल्वे
स्टेशन आणि रेल्वे
प्रवासात सोडून सर्वठिकाणी नि:संकोचपणे प्यावा आणि न
चुकता "चहा छान झालाय
हं
" हे
म्हणायला विसरू नये .विमान प्रवासातला चहा
रेल्वे प्रवासात मिळतो
त्यापेक्षा चांगला असतो असंच
काही नाही पण ६०
रुपयाचा चहा पिऊन त्याला
नाव ठेवण्यात आपलाच
मूर्खपणा दिसतो हे लक्षात
घ्यावे .
जगात आजपर्यंत सर्वात
जास्त प्रयोग झाले
असतील तर ते
चहा करायच्या प्रोसेस वर
याबद्दल माझ्या मनात अजिबात
शंका नाही ...गेली
४० वर्ष मी
आणि माझ्यासारखे अनेक
लोक चहा काय
केलं म्हणजे बढिया
होईल यासाठी नविन नविन
प्रयोग करत आहोत
व पुढे पण
करत राहू . मीच
काय मोठमोठ्या चहाच्या कंपन्या पण
नविन प्रयोग करत
आहेत .उत्तम चहा
हि आपल्या सर्वाचीच गरज
आहे आणि नेसेसिटी इज
मदर ऑफ इन्व्हेशन्स .
नव्या पिढीला चहाच फारस
प्रेम नाही ,शेजाऱ्याकडे किंवा
मित्राकडे ते चहा प्यायला हक्कानं जात
नाही . व्हाट्स ऍप
आणि एफबी वाल्या मुलामुलींना सोशल
व्हायचं असत ते फक्त
मोबाईलवर ...चहाची रेसिपी सांगणाऱ्या अनेक
वेब साइट पण
असतात पण जे
मुळात चहा कॉफी
काहीही न पीता
दिवसाची सुरवात करतात त्यांना उत्तम
चहा कशाला म्हणतात हे
सांगण्यात तरी काय अर्थ
आहे ?
देव त्यांना सद्
बुद्धी देवो व
लवकरात लवकर चहाबद्दल त्यांना आविष्कार होवो
हीच सदिच्छा करून
चहाच पुराण र्संपवतो ..... कॉफी बद्दल नंतर
कधी तरी नक्की
बोलूच !
------ राजेंद्र फणसळकर
१२ ओक्टोबर २०१६