शनिवारची दुपार . आय आय टी हॉस्टेल मधून बाहेर पडून मी मेन गेट
पर्यन्तच अंतर अलबेला सिनेमातली गाणी
गुणगुणत रमत
गमत जात होतो
. वाऱ्याची मंद झुळुक आली आणि
मला साजूक तुपाचा
वास आला . आपल्याला काही
तरी मिळत नय्ये याची जाणिव
झाली घरची आठवण
झाली …….होम …माय स्वीट होम ….आत्ता
आई काय करत असेल
…… विचाराच्या कल्लोळात बस
stop आला .
३९२ नम्बर ची
बस आली . विक्रोळी च्या
platform वर
उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा बघून पुन्हा
घरची आठवण आली
. विविध प्रकारचे वास
घेत आणि बाहेरची न
बघवणारी गर्दी बघत मी लोकल नी डोंबिवलीच्या मित्राकडे एकदाचा
पोचलो .
Call बेल वाजवल्यावर मित्रान दार उघडल …आणि
एकदम मला " कौन है
….मेरा तेल जल रहा है
" अस
म्हणत एन्ट्री घेणारी
Bobby मधली डिम्पल आठवली " खर म्हणजे डिम्पल
आणि मित्रात कुठलही
साम्य नव्हत व मित्राच्या अंगात भरपूर कपडे
पण होते ....तरीही डिम्पलची आठवण यायचं
कारण हे कि
मित्राचे हात कणिक भिजवत
असल्यामुळे माखले होते व चेहरा
डिम्पल सारखाच
गोड होता
! " डोंबिवलीला एवढी
हॉटेल्स असतांना पोळ्या करून घरी
जेवायचा अट्टाहास का ?" हे मला तेंव्हा समजल
नाही पण नंतर बडोद्यामध्ये नोकरी लागल्यावर अनेक खानावळी आणि हॉटेल्स मध्ये
जेवल्यावर लक्षात आल कि
घरी
केलेलं जेवण किती
चांगल असत व
का हवहवस वाटत .
ख़र म्हणजे
गुजराथ मध्ये खाण्यापिण्याची सर्वात जास्त
मजा (
माफ करा पिण्याची नाही
खाण्याची मजा)आणि बडोदा
म्हणजे जणु गुजराथचे पुणे ! तेंव्हा तिथे काय ऊणे असणार ? आणि गुजराथी लोकांसारखें खाण्याचे शौकीन
लोक मला आजवर
कुठही भेटले नाहीत
. रात्री १२ वाजता पण इथ गरम भजी तळतांना आणि
खातांना मी
लोकांना बघितलं आहे … आपल्या राज्यात होणार
तेल आपल्यालाच खायला हव असा त्यांचा समज
असावा व म्हणून
प्रत्येक पदार्थामध्ये हे लोक भरपूर तेल
घालतात . भाजीत किती तेल
आहे यावरूनच "भाजीची चव
पण न घेता " , भाजी चांगली
कि वाईट हे
ठरवतात
.
तर असल्या चमचमीत खाणाऱ्या प्रदेशात मला नोकरी लागून अवघे पाच महिने झाले असतानाच मी आणि माझा रूम पार्टनर संतोष , बाहेरच्या जेवणाला कंटाळलो … नुसतोच कंटाळलो नाही तर जाम वैतागालो.मास्टर शांतारामचा नवरंग सिनेमा ७ वेळा बघितला होता त्यातला हीरो महिपलचा एक डायलॉग होता " बाझार के हलवेसे घरकी सुखी रोटी अच्छी" तो ऐकून मी खदखदा हसलो होतो....पण अनेक ठिकाणी बाहेर जेवल्यानंतर मला त्याच महत्त्व कळल होत.
…. तत्पुर्वी . अडीच किंवा तीन रुपये प्लेट मध्ये मिळणाऱ्या जवळ जवळ सर्व खानावळीत आम्ही जेवून अक्षरश: चुकलो होतो ...अशा वेळी आम्हाला माझ्या दुरच्या मावशीचा आधार होता . सुरेश ओंक आणि प्रतिभा ताई यांना अतिशय अगत्य .... इतक कि आठवड्यातून २-३ दिवस आम्ही त्यांच्याकडेच जेवयचो …. तरी पण चुकून जर आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही तर त्यबद्दल त्यांची कम्प्लेंट असायची …… दुसऱ्या एका गोष्टीचा आधार होता तो म्हणजे ब्रेड . ब्रेड हा पदार्थ ज्या ज्या पदार्था बरोबर खातात त्या सर्व डिशेस आम्ही ट्राय केलेल्या होत्या . "ब्रेड बटर" , "ब्रेड जाम" , "ब्रेड चीज " , "ब्रेड लोणचे " ," ब्रेड आम्लेट " इतकच नव्हे तर मी ब्रेड श्रीखंड देखील खाऊन चुकलो होतो . ब्रेड बरोबर श्रीखंड खाऊन ब्रेडच प्रेस्टिज वाढ्ल की श्रीखंडाची डिग्निटी कमी झालं हे सांगण मात्र कठिण होत !
तर असल्या चमचमीत खाणाऱ्या प्रदेशात मला नोकरी लागून अवघे पाच महिने झाले असतानाच मी आणि माझा रूम पार्टनर संतोष , बाहेरच्या जेवणाला कंटाळलो … नुसतोच कंटाळलो नाही तर जाम वैतागालो.मास्टर शांतारामचा नवरंग सिनेमा ७ वेळा बघितला होता त्यातला हीरो महिपलचा एक डायलॉग होता " बाझार के हलवेसे घरकी सुखी रोटी अच्छी" तो ऐकून मी खदखदा हसलो होतो....पण अनेक ठिकाणी बाहेर जेवल्यानंतर मला त्याच महत्त्व कळल होत.
…. तत्पुर्वी . अडीच किंवा तीन रुपये प्लेट मध्ये मिळणाऱ्या जवळ जवळ सर्व खानावळीत आम्ही जेवून अक्षरश: चुकलो होतो ...अशा वेळी आम्हाला माझ्या दुरच्या मावशीचा आधार होता . सुरेश ओंक आणि प्रतिभा ताई यांना अतिशय अगत्य .... इतक कि आठवड्यातून २-३ दिवस आम्ही त्यांच्याकडेच जेवयचो …. तरी पण चुकून जर आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही तर त्यबद्दल त्यांची कम्प्लेंट असायची …… दुसऱ्या एका गोष्टीचा आधार होता तो म्हणजे ब्रेड . ब्रेड हा पदार्थ ज्या ज्या पदार्था बरोबर खातात त्या सर्व डिशेस आम्ही ट्राय केलेल्या होत्या . "ब्रेड बटर" , "ब्रेड जाम" , "ब्रेड चीज " , "ब्रेड लोणचे " ," ब्रेड आम्लेट " इतकच नव्हे तर मी ब्रेड श्रीखंड देखील खाऊन चुकलो होतो . ब्रेड बरोबर श्रीखंड खाऊन ब्रेडच प्रेस्टिज वाढ्ल की श्रीखंडाची डिग्निटी कमी झालं हे सांगण मात्र कठिण होत !
एका संध्याकाळी ऑफिस
मधून घरी रूमवर
आल्यावर आज काय वाट्टेल ते
झाल तरी आज बाहेर जेवायच
नाही असा मी धाडसी निर्णय घेतला आणि माझ्या
कुकिंग हॉबीची सुरवात झाली.
त्या
दिवशी बाजारातून डाळ,
तांदुळ कणिक असल्या गोष्टी
आणतांना अस्मादिकांना
"आटे
दाल का भाव
पता चला " . माझा "घरी स्वयंपाक" करायच्या निर्णयान संतोष
धास्तावला आणि दुसऱ्या रूम
पार्टनरनी , म्हणजे नंदू फाटक
नी मला वेडयात
काढल,
पण मी धीर सोडला नाही. " तांदुळ निवडण्यासरख्या बावळट
प्रकारान कुकिंगला सुरवात झाली… " आपल्याला काय येईल आणि काय
येणार नाही हे मला
चांगल माहीत होत
"म्हणून
पहिल्याच दिवशी पोळ्या करायाची रीस्क
मी घेतली नाही
.फ़क्त भात शिजवायचा कट
करण्यात आला. उत्तम प्रतिचा बासमती
म्हणूनच मी आणला होता…
नंदून
बाहेर जेवायच ठरवल
आणि संतोष द्विधा मन:स्थितीत होता … थोड्या
वेळान आमच्या बाथरूम कम
किचन मधून भात
शिजायाचा सुन्दर वास येऊ
लागला आणि संतोषची भिती
दूर
झाली …… पटकन बाहेर
जाऊन तो साजुक
तूप , दही आणि
बेडेकर लोणच घेऊन
आला …. मी नेटान
भातावर लक्ष ठेऊन
होतो उद्देश हाच की
भाताला जळू द्यायचं नाही
…. हसू नका…. आणि खर सांगा
कुकरचा
वापर न करता
तुमच्या ओळखीत किती जणांना
भात करता येतो ? असो……
त्या दिवशी मी
आणि संतोषनी बऱ्याच
दिवसांनी डिनर एन्जोय केल.
" नथिंग सकसीड्स लाईक
सक्सेस " मी माझ्या "भाताच्या " यशान खुपच उत्साहित झालो
होतो …आणि केवळ नाईलाजान सुरु
केलेल्या कुकिंगच रुपांतर 'कुकिंगच्या हॉबी' मध्ये केंव्हा झाल
हे माझ मला पण कळल
नाही … ऑफिस मधून येतांना
भाजी,मिरच्या ,कोथिम्बिर इत्यादि गोष्टी बरोबर , एखाद्या मित्राला पण मी घेऊन
येऊ लागलो .
क्वचितच तो मित्र आमच्या
रूमवर पुन्हा यायची हिम्मत
करायचा ….असो. तुम्ही जर
बडोद्याला आमच्या रूमवर संध्याकाळी आला
असता तर "टाईम्स ऑफ
इंडिया "वर कणिक किंवा पोहे चाळताना एकं
माणूस दिसला असता
….तो संतोष…. ऱवा भाजतांना किंवा
बारीक कांदा चिरतांना दुसरा
माणूस दिसला असता
…तो मी . …. आम्ही दोघ
पोटासाठी काही ना काही नविन
शिजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू लागलो होतो
…. …"नन्दुच
" आता
आमच्या कुकिंग स्कील
बद्दलच मत , मी
केलेल्या भाज्या खाऊन बदलल होत.
… मला पण आता "फोडणी करतांना हिंग
केंव्हा टाकतात "…"भेंडीच्या भाजीत पाणी टाकायचं नसत"…
,"उकडलेल्या बटाट्यांची साल
काढण्यापुर्वी
त्यांना पाण्यात टाकाव " . " साबुदाणा कसा आणि किती वेळ भिजवावा "…आणि …. " बोट न
कापता
कांदे कसे चिरायचे " इत्यादी गोष्टी
, मी
केलेल्या अनेक घोडचुकानंतर कळू लागल्या होत्या.
कुकिंग
वाटत तेवढ सोप नसत
हे बिघडलेल्या अनेक
पदार्थांवरून लक्षात आल होत
…. आपण
केलेला पदार्थ खायची हिम्मत
ज्याच्यामध्ये
नाही त्यांनी कुकिंगच्या फंदात पडू नये . तसच भाजीमध्ये नेहमी
मीठ
किंचित
कमी व तिखट थोडं जास्तच
टाकाव कारण "भाजी तिखट झाली"
असला कॉमेंट एकंण हे " भाजी आळणी अथवा बेकार झली " अस एकण्यापेक्षा कमी
इनसलटिंग असत हे मी
स्वानुभवान सांगु इच्छितो.
आम्ही घरी कुकिंग
करतो हि बातमी
सर्व दूर पसरली
होती . रादर आम्हीच ती पसरवली होती
…. पण
आमच कौतुक करण्याएवजी आमच्याकडे लोक सहानभूतीन बघु लागले होते …… आपल्या घरी जेवायला बोलावण
तर दूरच उलट " घरी स्वयंपाक करण्यापेक्षा लग्न करून
टाका
" असले
मोफ़त
सल्ले लोक देऊ लागले
. अथवा
आम्ही न ट्राय
केलेल्या हॉटेल वा खानावळीचे पत्ते
सांगू लागले. त्यातच नन्दुन
मला
न सांगता माझ्या
कुकिंगची त्याच्या एका दुसऱ्या मित्राजवळ वारेमाप स्तुति
केली आणि मला
न सांगता त्याला
सपत्निक रूम वर जेवायला बोलावलं …. जेंव्हा मला
हे कळल तेंव्हा मला
शॉकच बसला … दरवाजा वर
टकटक आवाज झाला
तेंव्हा मी कणिक भिजवत होतो …. ऐनवेळी मला
डोंबिवलीच्या डिम्पलची आठवण झाली म्हणून
मी शांतपणे स्वच्छ हात
धुऊन दार उघडल
…… दरवाजात नंदु
बरोबर
त्याचा मित्र आणि
मित्राची डिम्पल असे तिघेजण उभे होते …… आज आपल्या समोर काय
वाढून ठेवलंय असे
काळजीचे भाव त्या मुलीच्या चेहऱ्यावर अगदी
लख्ख दिसत होते . माझी ओळख
" हाच
तो राजू जो कुकिंग
करतो " अशी करून देण्यात आली
…. मला
राग आला व "
रोटी छोडके सब
कुछ रेडी हैं
। "…… " रोटी नंदु बनाएगा
…" अशी
नंदूची फिरकी घेत
मी शांत बसून
राहिलो ……. . त्या दिवशी घरी जेवायला आलेल्या त्या
मुलीला सर्व पोळ्या
कराव्या लागल्यात हे सांगणे न
लगे ! ….
कुकिंग झाल्यावर भांडी
घासणे हे न
आवडणार काम पण वाढलं
होत त्यामुळे कुकिंगचा उत्साह हळूहळू कमी
होऊ लागला होता
"बायका
वर्षानुवर्ष कस काय कुकिंग
करतात " ह्याच मला आश्चर्य आणि
कौतुक वाटू लागल
होत …. तीन चार
महिन्यातच आमचा उत्साह मावळला
त्याच
सुमारास …संतोष बडोदा
सोडून नागपुरला गेला आणि नंदु
पुण्याला …नाईलाजान मी बडोद्यातच माझ्या
ऑफिसच्या सिनिअर
मित्रांबरोबर एका बंगल्यात शिफ्ट
झालो . या ठिकाणी
कुकिंग हि गरज
नसून खरोखर हॉबी
होती .…. इतर दोन्ही पार्टनर्स साउथ इंडियन होते त्यामुळे भातावर
भयंकर खुष असायचे.
आमचा "राम कृपाल " नावाचा एक
कुक होता …रेगुलर
स्वयंपाक तो करायचा …. केवळ हौस म्हणून मी
इथ स्वीट डिश बनवायचो आणि
…गरज म्हणून राम कृपाल
नी
केलेल्या भाज्या
रिपेअर
करायचो,…. इथल किचन
चांगल होत पण
वातावरण अतिशय फोर्मल … शिवाय
रोज नुसता भात
खाण हे मला
कधी कधी असह्य
व्हायच …. राम कृपाल
हा मठ्ठ होता त्याला किती
पण समजवल तरी
' पालथ्या घागरीवर पाणी
'असा प्रकार होता
….
कुकिंग पासून सुटका
व्हायला चांगला कुक इम्प्लोय करणे
हा एक उपाय होता पण
कुक शेवटी पैशासाठी काम
करणारा माणूस … दुसरा कुक सांगितल्याप्रमाणे स्वयंपाक करतांना कदाचित मोजून ,मापून
तिखट
,मीठ ,मसाला टाकेल सुद्धा ……पण तो
प्रेम थोडीच टाकणार ?
तात्पर्य काय … " यंदा कर्तव्य आहे
" !
------------राजेन्द्र फणसळकर
२३
एप्रिल १९८०
बडोदा
-----------------------_-------------------
No comments:
Post a Comment